भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण विराजमान होणार? याची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे नड्डा यांचा कार्यकाळही संपला आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण? यासाठी चार नावांची चर्चा होते आहे. दरम्यान, याच आठवड्यात म्हणजेच ६ एप्रिल रोजी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल अशी शक्यता आहे.
शिवराज सिंग चौहान, भुपेंद्र यादव , मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान ही चार नावं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. ६ एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे या दिवशी नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.