एकनाथ शिंदे दरे गावला जाताना हेलिकॉप्टर का वापरतात? शिंदेंनी दिलं उत्तर

एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्या दरे गावला जाताना हेलिकॉप्टर वापरत असल्यामुळे टीका होते. यावर त्यांनी आता उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने गावी जातो. तेव्हा काही लोक म्हणतात मी शेती करायला हेलिकॉप्टरने जातो. मी गाडीने गेलो तर गावी जायला सात-आठ तास लगतील. या सात-आठ तासांत मी दहा हजार सह्या करू शकतो. सह्यांमध्ये माझे रेकॉर्ड आहे.” ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, “गावी गेल्यानंतर गावकऱ्यांच्या भेटी होतात. तिथे मी अधिकाऱ्यांनाही बोलावतो. गावी आम्ही क्लस्टर शेती करतो. आम्ही तिकडे ५०० प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. याचबरोबर बांबूची शेतीही करतो. तिथल्या तरुणांना नोकरीसाठी इतर शहरांत यावे लागून नये ही यामागची माझी संकल्पना आहे. त्याला तिथेच नोकरी मिळाली पाहीजे. तिथे कोयनेच्या बॅक वॉटरमध्ये, वॉटर स्पोर्ट्स सुरू केले आहेत. आताचे हिल स्टेशन्स ब्रिटिश काळातील आहेत. आता आपण करत असलेले नवे महाबळेश्वर हे पहिले हिल स्टेशन असेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here