पुण्यातील एका महिलेने रिक्षाचे ५० रुपये भाडे गुगल पेद्वारे देताना चुकून ५० हजार रुपयांची रक्कम पाठवली. मात्र चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी रिक्षाचालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.
रिक्षा चालक फोन उचलत नाही हे पाहून तिने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत रिक्षा चालकाला शोधून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर तक्रारदार महिलेला पन्नास हजार रुपये परत मिळवून दिले. त्यामुळं तक्रारदार महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे आभार मानले.