हल्लीच्या स्पर्धेच्या युगात धावताना मानसिक ताण, स्ट्रेस हे आपले सोबती झालेले आहेत. प्रत्येकाला कोणता ना कोणता ताण आहेत. यात तरुण वर्गाकडे पहिला तर वर्क लाईफ बॅलन्स, स्ट्रेस लेव्हल मॅनेज करताना त्यांची खूप दमछाक होते. जे फ्रेशर असतात त्यांना चांगली नोकरी मिळेल का याचा ताण असतो, मिळाली तर मनासारखी मिळेल का, कामाचा ताण, मित्र मैत्रिणी घरचे यांना वेळ देता येत नाही. या सगळ्यात आवड, छंद हे तर दूरच राहिले. आरोग्य बिघडतं. शारीरिक आजार, मानसिक ताण तणाव या गर्तेत तरुणाई अडकत जाते, बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही.
मग पुण्याची 26 वर्षीय अतिशय हुशार असलेली CA ॲना सेबॅस्टियन हिने कामाच्या ताणातून आत्महत्या केल्याची बातमी येऊन धडकते. किंवा कामाचा अतिताण, टार्गेट्स पूर्ण करण्याचं प्रेशर पगार कपात आणि सतत कामावरुन काढून टाकण्याची कंपनीतून मिळणारी धमकी या सगळ्याचा ताण सहन न झाल्याने मोठ्या फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या अशा बातम्या आपण मधून अधून वाचतो आणि मन सुन्न होतं. आनंदी जीवन जगण्यासाठी पैसे कमावण्यासाठी आपण नोकरी करतो. पण त्या कामातून आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर हे गंभीर आहे.
आजच्या तरुणाईमध्ये मानसिक ताण तणाव, स्ट्रेस, नैराश्य का वाढलं आहे, त्याची काय कारणं आहेत? त्यातून बाहेर कसं पडायचं याविषयी कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट सिद्धी वैद्य यांच्याशी खास संवाद साधला आहे. तो नक्की पहा