श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा आज साखरपुडा झाला. मुंबईत या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यासाठी आज पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र आलं. अजित पवार कुटुंबासह दाखल झाले होते. सुप्रिया सुळे, शरद पवारही या साखरपुड्यासाठी आले होते. या साखरपुड्याचा पहिला फोटो समोर आला आहे.
युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी अजितदांविरुद्ध रिंगणात उतरले होते.