इंडियन एक्स्प्रेसने भारतातल्या १०० प्रभावी लोकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अर्थातच नरेंद्र मोदी, गौतम अदाणी यांची नावं आहेत. शिवाय महाराष्ट्रातली नावंही आहेतच. पण एकही ठाकरे या यादीत नाहीत. १०० प्रभावी व्यक्तींच्या यादीत महाराष्ट्रातली किती नावं आहेत जाणून घेऊ.
मोहन भागवत, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, पियूष गोयल, अजित पवार, शरद पवार हीच नावं आहेत. १२ व्या क्रमांकावर पियूष गोयल, १३ व्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस, १५ व्या क्रमांकावर नितीन गडकरी, ५१ व्या क्रमांकावर एकनाथ शिंदे, ५७ व्या क्रमांकावर अजित पवार आहेत. तर शरद पवार ७७ व्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रातली सात नावं या यादीत आहेत. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंपैकी एकही नाव या यादीत नाही. अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, करण जोहर, शाहरुख खान या सेलिब्रिटींचीही नावं आहेत.