भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणावस्थिती आहे. याच युद्धजन्य परिस्थितीचा पहिला फटका दोन्ही देशांच्या शेअर मार्केटना बसला आहे. भारतीय शेअर बाजारात मोठा धमाका पहायला मिळाला. फक्त १० सेकंदात ३०० अब्ज रुपयांचा चुराडा झाला आहे. तर पाकिस्तान शेअर बाजारही ठप्प झाला आहे.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली. कराची आणि लाहोरसह प्रमुख शहरांमध्ये ड्रोन पाडल्याच्या बातम्यांनी बाजारातील घबराट वाढवली. सकाळी बाजार सुरु होताच भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ९२५ अंकांनी किंवा १.२ टक्क्यांनी घसरला, तर एनएसईचा निफ्टी १५६ अंकांनी घसरून २४, ११७ वर पोहोचला.