एसटी महामंडळाकडून कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची आणि मोठी बातमी!

यंदा गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळ यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा गाड्या सोडणार आहे. 22 जुलै पासून गट आरक्षणाला सुरुवात होणार असून महिला व ज्येष्ठांना सवलत मिळणार आहे.

जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणा बरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे. 23 ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी 4300 बसेस सोडण्यात आल्या होत्या.

या बसगाड्यांचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर करता येणार आहे. तसंच, आरक्षण बसस्थानकात किंवा महामंडळाच्या अॅपवर करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here