मध्य रेल्वेच्या दिवा- मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली आहे. फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारून जात असतानाच हा भीषण अपघात झाला. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सीएसएमटी लोकल आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत असताना ही घटना घडली. एक लोकल कसाऱ्याकडे तर दुसरी कसारा लोकल ही सीएसएमटीकडे जात होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आणि जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
पडलेल्या लोकांमध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. “पाच प्रवासी मुंब्रा स्थानकाच्या जवळ एका ट्रेनमधून पडल्याची माहिती मिळाली आहे. ही गाडी कसाऱ्याला जात होती. त्यातील गार्डने ही माहिती दिली. दिवा आणि मुंब्रा येथून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे,” अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिली.
“ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात झाल्याचे मानले जात आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक सेवांवरही परिणाम झाला आहे,” अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.