एअर इंडिया अपघातातून वाचला आठ महिन्यांचा ध्यांश

एअर इंडिया विमान अपघातातनंतर काही भावुक कहाण्या समोर येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 8 महिन्यांचा ध्यांश याची. ध्यांशला त्याच्या आईने आगीपासून वाचवले आणि त्याच्या गंभीर जखमांवर उपचार करण्यासाठी स्वतःच्या त्वचेचे दानही केले. डॉक्टरांच्या मते, 36% भाजलेला हा लहान मुलगा आता बरा होतोय. कारण त्याच्या आईच्या त्वचेचा उपयोग त्याच्या जखमांना बरे करण्यासाठी उपयुक्त ठरलाय. ध्यांशची आई मनीषा देखील या दुर्घटनेत 25% जळाली होती.

12 जून रोजी एअर इंडिया फ्लाइट क्रमांक 171 बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटल परिसरात कोसळले. त्या वेळी मनीषा कछाडिया आणि त्यांचा मुलगा ध्यांश दुर्घटनेने बाधित झालेल्या इमारतींपैकी एकामध्ये होते. ध्यांशचे वडील कपिल कछाडिया हे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये युरोलॉजीमध्ये सुपर-स्पेशालिटी एमसीएच डिग्री कोर्स करत आहेत आणि ते सिव्हिल हॉस्पिटलशी संलग्न आहेत. दुर्घटनेच्या वेळी कपिल रुग्णालयात होते, तर त्यांची पत्नी आणि मुलगा त्यांना वाटप केलेल्या निवासस्थानात होते. या भयंकर दुर्घटनेत मनीषा आणि ध्यांश दोघेही जळाले होते. पण ते दोघेही आता उपचारांमुळे सावरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here