धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती नाही

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. या प्रकल्पाला स्थगिती देण्यासंदर्भात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाचा युक्तिवाद मान्य केला आहे. यावेळी न्यायालयाने सांगितले की, धारावी प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. यामध्ये सेकलिंक टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशनने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली.

अदानी ग्रुप सर्व पेमेंट एकाच एस्क्रो खात्यातून करेल असे खंडपीठाने म्हटले आहे. अदानी समूहाच्या वतीने वरिष्ठ वकील रोहतगी म्हणाले की, काम आधीच सुरू झाले आहे, कोट्यवधी किमतीची मशीन्स आणि उपकरणे आधीच बसवण्यात आली आहेत. येथे सुमारे २००० लोक काम करतात आणि अशा हालचालीमुळे कधीही भरून न येणारे, अपरिवर्तनीय नुकसान होईल. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here