अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुरुवातीपासूनच अंजली दमानिया या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आक्रमक भूमिका घेताना दिसल्या. सातत्याने अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. शेवटी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याचेही काही व्हिडीओ दमानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आता परत एकदा अंजली दमानिया या धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. आता अंजली दमानिया यांनी काही आरोप करत म्हटले की, धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करा. दमानिया यांनी म्हटले की, संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा खंडणी हे सर्वकाही धनंजय मुंडे यांना माहिती होते आणि त्यांचाच बंगल्यावर याबद्दलची मिटिंगही झाली होती. धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झालेल्या मिटिंगमध्ये दोन पोलिस अधिकारी देखील उपस्थित होते. पण आरोपपत्रात याचा उल्लेख नाहीये. याबद्दलच्या कॉपी मी उज्वल निकम यांना देणार असल्याचेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. आता धनंजय मुंडे यांची आमदारकी पण रद्द होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे.