केरळमधील भाजपाचे नेते आणि पुंजर विधानसभेचे माजी आमदार पीसी जॉर्ज यांनी लव्ह जिहादमुळे एकट्या मीनाचिल तालुक्यातून ४०० मुली हरवल्या आहेत. त्यापैकी केवळ ४१ मुलींना परत आणण्यात यश आल्याचे सांगितले. एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
पीसी जॉर्ज यांनी पुढे म्हटले की, केरळमधील सद्यपरिस्थिती पाहता ख्रिश्चन पालकांनी त्यांच्या त्यांच्या मुलींचे वय २४ वर्ष होण्याआधीच लग्न लावावे. तसेच अलीकडे एराट्टूपेट्टा येथे मोठ्या प्रमाणात स्फोटके ताब्यात घेण्यात आली होती. यावर बोलताना ते म्हणाले, संपूर्ण राज्य उध्वस्त करण्यासाठी ही स्फोटके पुरेशी होती.
पीसी जॉर्ज यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी टीव्ही चॅनेलच्या चर्चेदरम्यान अल्पसंख्याक समुदायाविरोधात चिथावणीखोर भाष्य केले होते. त्यामुळे त्यांना अटकही झाली होती. त्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना २८ फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता.