IIT च्या धर्तीवर मुंबईत होणार IICT

xr:d:DAFFuQ1RO2w:174,j:30841316958,t:22071516

IIT अर्थात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीबरोबरच IICT देखील देशभरात शिक्षण क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे पहिली आयआयसीटी संस्था मुंबईत उभारली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी IICT साठी गोरेगावमधील फिल्म इंडस्ट्रीत जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले.

मुंबईत १ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईतल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात वेव्हज २०२५’ या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यातील प्राथमिक सत्राचं आयोजन दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे करण्यात आलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

“या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक स्तरावरील ‘क्रिएटिव्ह हब’ बनवण्याचा सरकारचा मानस असून केंद्र सरकारकडून या संस्थेच्या उभारणीसाठी ४०० कोटींची आर्थिक सहाय्यता दिली जाणार आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल”, असं फडणवीसांनी यावेळी नमूद केलं.

याशिवाय, “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, ही संस्था केवळ चित्रपट निर्मितीपर्यंत मर्यादित न राहता इथे डिजिटल कंटेंट, व्ही. एफ. एक्स (VFX), अॅनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरीटेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब ३.० तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमध्ये संशोधन व प्रशिक्षण देण्यात येईल. आयआयटी मुंबईप्रमाणेच ही नवी संस्था क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसाठी देशातलं सर्वोत्तम केंद्र बनेल”, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here