अमेरिकन सेंट्रल कमांड (CENTCOM) फोर्सेस आणि इराकी इंटेलिजन्स अँड सेक्युरिटी फोर्सेस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आयसीसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक अब्दल्ला मक्की मुसलीह अल-रिफाई उर्फ अबू खादीजा याला ठार करण्यात आले आहे. अबू खादीजा हा आयसीसचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता होता. त्याच्याकडे जगभरातील कारवायांची जबाबदारी होती. अबू खादीजा सोबत आणखी एक आयसिस ऑपरेटीव्ह ठार झाल्याची माहिती सेंटकॉम (Centcom)ने दिली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला करण्यात आलेल्या या एअर स्ट्राइकच्या माध्यमातून त्यांना ठार करण्यात आले.
या हवाई हल्ल्यानंतर सेंटकॉम आणि इराकच्या लष्कराने या भागाचा ताबा घेतला आणि डीएनए मॅचिंगच्या माध्यमातून अबू खादीजाची ओळख पटवली.स्ट्राइकनंतर, सेंटकॉम आणि इराकी सैन्याने स्ट्राइक साइटवर दाखल झाले आणि त्यांना दोन्ही मृत आयसिस दहशतवादी आढळून आले. दोन्ही दहशतवाद्यांनी न फुटलेले आत्मघाती जॅकेट घातले होते आणि त्यांच्याकडे अनेक शस्त्रे होती, अशी माहिती देखील अमेरिकन सैन्याने दिली आहे.