सीबीआयने सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांत सिंगचा मृत्यू ही आत्महत्या होती असं म्हटलं आहे. तसंच या प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लिन चिटही दिली आहे. दरम्यान दिशा सालियनच्या वकिलांनी या क्लोजर रिपोर्टला व्हॅल्यू नसल्याचं म्हटलं आहे.
“कायद्यानुसार या क्लोजर रिपोर्टला काहीही व्हॅल्यू नाही. त्याचा दुसऱ्या केसवर काही परिणाम होणार नाही. आरुशी हत्या प्रकरण आणि इतर हत्या प्रकरणांमध्येही क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने मान्य केला नव्हता. दिशा सालियन केसमध्ये योग्य न्याय मिळेल.” असं निलेश ओझा यांनी म्हटलं आहे.
निलेश ओझा म्हणाले, दिशा सालियन प्रकरणात एसआयटीकडून उशीर होतो आहे. आरोपीबाबत पुरावे आहेत, शिवाय आणखी पुरावे समोर येतील. मोबाइल टॉवर लोकेशन आणि इतर पुरावे हाती येतील. आमच्याकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. आदित्य ठाकरेंच्या विरोधातही ठोस पुरावे आहेत. असं ओझा यांनी म्हटलं आहे.