जे. पी नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात मुस्लिम आरक्षणावरून वाद

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत आज जे. पी नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात वाद झाला. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजेजू यांनी कर्नाटक सरकारने मुस्लिम आरक्षण देण्याबाबत जो निर्णय घेतला तो मुद्दा केला. त्यावेळी जे. पी. नड्डा यांनी हे आरक्षण म्हणजे घटनेच्या तत्त्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं.

सरकारी कंत्राटं देताना अल्पसंख्याकांना चार टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्या तरतुदीबाबत राज्यसभेत जे.पी. नड्डा यांनी कर्नाटक सरकारवर जोरदार टीका केली आणि काँग्रेसवरही टीका केली. याबाबत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आरक्षण कुणीही रद्द करु शकत नाही असं ठणकावून सांगितलं. राज्यसभेत जे. पी. नड्डा, किरण रिजेजू यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. ज्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंनी त्यांना उत्तर दिलं. काँग्रेसचा संविधान वगैरे बदलण्याचा काहीही विचार नसल्याचं खरगे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here