कुणाल कामरा म्हणतो माझा पुढील कार्यक्रम एल्फिस्टन ब्रीजवर!

कुणाल कामराने ज्या ठिकाणी त्याचा कार्यक्रम घेतला होता त्या ‘दी हॅबिटॅट’ स्टुडिओची शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. यावर मिश्किल टिप्पणी करताना कुणालने म्हटलं आहे की मी आता मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रीजवर (प्रभादेवी) पुढचा शो करणार आहे. तो म्हणाला, “माझ्या पुढच्या कार्यक्रमाचं ठिकाण असं असेल जे पाडण्याची अधिक गरज आहे. मी एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील अशा इमारतीची निवड करेन जी पाडण्याची गरज आहे.”

मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रीज १० एप्रिलपासून बंद केला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) हा १२५ वर्षे जुना पूल लवकरच पाडणार आहे. त्याजागी शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्प उभारण्याची एमएमआरडीएची योजना आहे. एल्फिन्स्टन पूल पाडून तिथे डबल डेकर पूल उभारला जाणार आहे. यामुळेच कुणाल कामराने हे उपहासात्मक वक्तव्य केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here