कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, महाराष्ट्रात तीन नवीन एफआयआर दाखल

कॉमेडियन कुणाल कामरा याला एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन गाण्या प्रकरणात अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बदनामी करणारे वक्तव्य केल्या प्रकरणात कामरा याच्याविरोधात महाराष्ट्रात आणखी तीन एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत.

हे नवीन गुन्हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करण्यात आले आहेत. तीन नवीन एफआयआर देखील शिवसेना कार्यकर्त्यांनी दाखल केल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे मयूर बोरसे यांनी तर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे संजय भुजबळ आणि नाशिकच्या नांदगाव मनमाड येथे सुनील जाधव यांनी एफआयआर दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here