राजधानी दिल्लीत निवडणुकीमुळे वातावरण तापलंय.. प्रचार शिगेला पोहोचलाय.. हल्ली प्रचार म्हणजे काय तर विरोधी पक्षावर टीका करा, मग ती खालच्या पातळीवर केली तर चालते यांच्या नियमानुसार.. त्यांनी कसं काही केलं नाही.. ते कसे वाईट एवढंच सांगणं म्हणजे प्रचार.. आता हे केजरीवाल यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले.. मध्यंतरी स्वतःच्या मनाने रचून रामायाणातला एक प्रसंग सांगितला.. आता पुन्हा एकदा एक हास्यास्पद विधान केलंय..
27 जानेवारी ला केजरीवालांनी एक विधान केलं..
हरियाणातील भाजप सरकारवर यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता.
मात्र, जल बोर्डने ते पाणी दिल्लीत येण्यापासून रोखले. भाजप सरकारने असे विष पाण्यात मिसळले आहे, जे जलशुद्धीकरण केंद्रातूनही स्वच्छ होऊ शकत नाही. त्यामुळे दिल्लीतील एक तृतीयांश भागात पाणीटंचाई आहे. दिल्लीत अराजक माजवण्यासाठी हे केले गेले आहे, जेणेकरून दिल्लीतील लोक मरतील आणि याचा दोष ‘आप’वर येईल. असा आरोप केजरीवाल यांनी केला. या आरोपाला हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनीही प्रत्युत्तर दिलंय. यावरचा खास व्हिडिओ नक्की पहा.