पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 एप्रिल रोजी रामेश्वरममध्ये भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट समुद्री पुलाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान इतर अनेक प्रकल्पांचेही उद्घाटन करणार आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वेने नवीन पांबन पुलाचा एक प्रमोशनल व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
पांबन पूल बांधण्यासाठी एकूण 550 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 एप्रिल रोजी दुपारी नवीन बन रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते रामेश्वरम-तांबरम (चेन्नई) रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. या दरम्यान तटरक्षक दलाच्या जहाजालाही हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.