उत्तर प्रदेशमधील वृंदावन शहरातील ठाकूर बांके बिहारी महाराज मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे दान दिलेले पैसे मोजताना ते चोरणाऱ्या कॅनरा बँकेच्या एका अधिकार्याला पोलिसांनी अटक केली आहे.
वृदांवन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मथुरा येथील डॅम्पियर नगर शाखेत काम करणाऱ्या अभिनव सक्सेनाने गेल्या तीन दिवसांत पैसे चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून ९ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जप्त करण्यात आली आहे.
बँकेने तात्काळ त्या अधिकाऱ्याला निलंबित केले आणि त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली. त्याने २०२० पासून चार वर्षे बँकेच्या वृंदावन शाखेतही काम केले होते.