छोट्या पडद्यावरच्या मालिका हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्या मराठी मालिका विश्वात स्टार प्रवाह वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर आहे. एखाद्या मालिका चालवताना त्यामागे अनेक जण मेहनत करत असतात. मालिकेची टीम, चॅनलची टीम, क्रू मेंबर्स मेहनत घेत असतात. त्यामुळे या कलाकारांचा वर्षातून एकदा सन्मान करण्यासाठी वाहिन्या पुरस्कार सोहळे आयोजित करतात. स्टार प्रवाह वाहिनीने नुकतीच त्यांच्या पुरस्कार सोहळ्याची घोषणा केली आहे.
स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात यंदा 14 मालिका पुरस्कारांच्या शर्यतीत आहे. साधी माणसं’, ‘मुरांबा’, ‘शुभविवाह’, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’, ‘उदे गं अंबे’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ठरलं तर मग!’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’, ‘येड लागलं प्रेमाचं’, ‘तू ही रे माझा मितवा’ आणि ‘अबोली’ अशा 14 मालिका आहेत. यंदा पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा पुरस्कार सोहळा येत्या १६ मार्चला संध्याकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे. प्रेक्षक आतुरतेने या पुरस्कार सोहळ्याची वाट पाहत आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने पुरस्कार सोहळ्याची घोषणा करताच नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.’ठरलं तर मग बेस्ट मालिका, बेस्ट जोडी’, “अरे वाह किती दिवसांपासून वाट पाहत होतो”, “यावेळी नंबर १ लक्ष्मीच्या पाऊलांनी होईल”, “खलनायिका प्रियाला मिळायला पाहिजे”, “चैतन्यला पण अवॉर्ड द्या”, अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत.
गेल्या वर्षी ठरलं तर मग ही महाराष्ट्राची महामालिका ठरली होती. यंदा कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे.