अखेर तहव्वुर राणा भारताच्या हाती!

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला भारतात आणण्यात आले आहे. त्याला खास विमानाने आज दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले. यानंतर त्याला विमानतळावरुन थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात नेले जात आहे. तिथे तपास संस्थांच्या पथकाकडून त्याची चौकशी केली जाईल. यानंतर तहव्वुर राणाला तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. 

तहव्वुर राणा अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. लष्कर-ए-तैयबा आणि डेव्हिड हेडलीशी संबंध असल्याने भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता. आता अखेर या प्रयत्नांना यश आले अन् राणा भारतात दाखल झाला.

दरम्यान, आता राणाच्या प्रत्यार्पणाबाबत पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानने तहव्वुर राणापासून स्वतःला दूर केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एका निवेदनात म्हटले की, “तहव्वुर राणाने गेल्या दोन दशकांत त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही, त्यामुळे त्याचे कॅनेडियन नागरिकत्व अगदी स्पष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here