अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट कधी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार याची सगळेच प्रतीक्षा करत होते. आता आज 11 एप्रिल रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्स इंडियानं काल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली होती. त्यानंतर प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. तर छावा गेल्या 56 दिवसांपासून थिएटरमध्ये यशस्वीपणे कमाई करत होता. आता हा चित्रपट अखेर ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कनं दिलेल्या माहितीनुसार, 56व्या दिवशी म्हणजेच OTT रिलीजच्या आदल्या दिवशी, ‘छावा’ने भारतात 30 लाखांची कमाई केली. आतापर्यंत भारतात एकूण नेट कलेक्शन 599.85 कोटींचं झालं आहे, तर वर्ल्डवाइड कमाई 805.25 कोटींवर पोहोचली आहे.