उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील एका अजब प्रेमप्रकरणाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. येथे एक सासू चक्क आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेली होती. हे प्रकरण उघड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
दरम्यान पोलीस अनेक ठिकाणी धाड टाकून त्यांचा शोध घेत होते. अखेर आज म्हणजे बुधवारी पोलीस दोघांचा शोध लावण्यात यशस्वी झाले आहेत. दोघांना नेपाळच्या सीमेवरुन पोलिसांनी अटक केली आहे. आज 16 एप्रिल रोजी राहुल आणि शिवानी यांचं लग्न होणार आहे. योगायोग म्हणजे आजच्याच दिवशी पोलिसांनी राहुल (जावई) आणि अनिता (सासू) यांना अटक केली आहे.
लग्नाला 10 दिवस शिल्लक असतानाच 6 एप्रिल रोजी अनिता आपला होणारा जावई राहुलसोबत पळून गेली होती. पोलिसांनी दोघांच्या मोबाईलच्या आधारे त्यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यांचे मोबाईल फोन 10 दिवस स्विच ऑफ होते. राहुल आपला मोबाईल सुरु करताच पोलिसांनी त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांना नेपाळच्या सीमेवर अटक करण्यात आली.