कर्नाटकातील शिवमोगा येथे सीईटी म्हणजेच कॉमन एन्ट्रन्स टेस्ट दरम्यान वाद निर्माण झाला. परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना जानवं आणि मनगटावरील धार्मिक धागा काढण्यास सांगण्यात आले. शिवमोग्गा येथील आदि चुंचुंगिरी पीयू कॉलेज कॅम्पसमध्ये ही घटना घडली. सीईटी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने परीक्षा केंद्रावर येते होते. सर्व परीक्षार्थींची कसून तपासणी सुरु होती. दरम्यान 3 विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर थांबवण्यात आले. त्यांच्या अंगावरील जानवं आणि हातावर बांधलेला संरक्षक धागा (कलावा) काढण्यास सांगण्यात आला.
गेटवर उपस्थित असलेले सुरक्षा रक्षकांनी परीक्षार्थींची कसून तपासणी करत होते. यावेळी त्यांनी २ विद्यार्थ्यांना हटकले. कारण त्यांनी जानवं आणि मनगटात धार्मिक धागा बांधला होता. धार्मिक धागा परीक्षेच्या आड येत नव्हता, त्यामुळे आम्हाला परीक्षेला जाऊ द्या, असे विद्यार्थी सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण सुरक्षारक्षक ते ऐकण्याच्या मनस्थित नव्हते. जानवं आणि कलावा काढा तरच प्रवेश मिळेल यावर सुरक्षारक्षक ठाम होते. यातील तिसरा विद्यार्थी धागा न काढण्यावर ठाम होता. त्यामुळे विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांतील वाद वाढत गेला आणि हळुहळू तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागले.
ही घटना १६ एप्रिल रोजी घडली. ज्यामध्ये संबंधित विद्यार्थ्याला सुमारे 15 मिनिटे गेटवर थांबवण्यात आले. अखेर रक्षकांनी त्याच्या हातातील संरक्षक धागा काढला आणि यानंतरच परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली. ही माहिती हळूहळू संपूर्ण परिसरात पसरली आणि प्रकरणाला वेगळेच वळण लागले. अखिल कर्नाटक ब्राह्मण सभेने या घटनेचा निषेध केल. त्यांनी तात्काळ जिल्हा दंडाधिकाऱ्यांची (डीएम) भेट घेतली आणि कठोर कारवाईची मागणी केली. आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून दोषींवर त्वरित कारवाई करावी, असा आरोप त्यांनी केला.