पाच वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. डारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महिला कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा केवळ निवेदन देण्यासाठी किंवा मोर्चे काढण्यासाठी वापर करू नका. यासाठी लागणाऱ्या गाडीच्या खर्चासाठी देखील कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करावे आणि केवळ निवडणुकीपुरता वापर न करता पक्षाच्या होणाऱ्या बैठकांमध्ये त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशा भावना या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्याचे सांगितले जात आहे.