श्रीशांतवर आता तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी केरळ क्रिकेट असोसिएशनने (केसीए) ने घातली आहे. संजू सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीमधून वगळण्यात आले तेव्हा त्याने त्याच्या समर्थनार्थ एक विधान केले होते. त्यावरून केसीएने त्याच्या विधानाला वादग्रस्त आणि अपमानास्पद म्हणत त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे.
श्रीशांत सध्या केरळच्या कोल्लम आर्यन फ्रँचायझी संघाचा सह-मालक आहे. संजूमुळे झालेल्या या वादामुळे श्रीशांतसह कोल्लम, अलाप्पुझा लीड आणि अलाप्पुझा रिपल्स संघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यावर फ्रँचायझी संघांनी समाधानकारक उत्तरे दिली. यामुळे त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात आली नाही. परंतु, एका निवेदनात म्हटले आहे की, ‘फ्रँचायझी संघांनी नोटीसला समाधानकारक उत्तर दिले असल्याने, त्यांच्यावर पुढील कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तथापि, संघ व्यवस्थापनातील सदस्यांची नियुक्ती करताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.’ 30 एप्रिल रोजी कोची येथे झालेल्या केसीएच्या विशेष सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.