पहलगाममधील बैसरन घाटीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता बैसरन घाटीच्या (Baisaran) आसपासच्या जंगलांमध्ये कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान, काल (५ एप्रिल) रोजी सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
जेंव्हा सुरक्षा दलाच्या जवानांनी या संशयिताला पकडलं तेंव्हा तो बुलेटप्रूफ जॅकेटचे कव्हर घालून असल्याची माहिती समोर येत आहे. या व्यक्तीची कसून चौकशी केल्यानंतर त्याला कुठल्याही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देता येत नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी या संशयिताला पोलीसांच्या ताब्यात दिलंय.