दिल्लीचे तख्त राखण्यासाठी राजकारणात चांगलीच चढाओढ सुरू आहे.. 5 फेब्रुवारीला दिल्लीचं भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे.. आणि 8 फेब्रुवारीला दिल्लीचा गडावर कोणाचं झेंडा फडकणार हे कळेल.. कालच प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.. निवडणुका घोषित होताच आश्वासनांचा सुकाळ सुरू होतो.. दे दणादण घोषणांचा पाऊस पडतो.. सगळीकडे चिखल होतो नुसता.. त्यातल्या किती पूर्ण होतात किती नाही हा आपला आता चर्चाच विषय नाही.. पण दिल्ली निवडणुकीत तर आश्वासन घोषणा यांची मालिका च पाहायला मिळाली..
दिल्लीच्या प्रचारात आप, भाजप आणि काँग्रेस यांच्यात शर्यत रंगली होती.. घोषणांची खैरात पाहायला मिळाली.
पण आता केजरीवालांना निवडणुकी पूर्वीच दणका बसलाय.. पक्ष गळतीला सुरुवात झालीय.. सत्ताधारी आप पक्षाच्या आठ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. आप पक्ष हा त्यांच्या प्रामाणिक विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप करत या आठ आमदारांनी पक्षाला राम राम ठोकला आहे..
पक्षाने दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत, शीश महालचा मुद्दा, भ्रष्टाचार, केजरीवालांवरचा विश्वास उडाला अशी कारण या आमदारांनी दिली आहेत. त्यावरचा हा खास व्हिडिओ नक्की पहा.