भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात युद्ध स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पाक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. पुण्याहून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच दगडूशेठ गणपती मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पुण्याहून १३ विमानांचे उड्डाणे रद्द करण्यात आले आहे. पाकच्या हल्ल्यानंतर पुण्याहून इतर शहरात जाणारी प्रवासी विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. अमृतसर, हैदराबाद, कोची, जोधपूर, चंदिगड, राजकोट, जयपूर, सुरतला जाणाऱ्या फ्लाईट रद्द करण्यात आली आहे.