भारत-पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या संघर्षस्थितीवर परराष्ट्र मंत्री प्रवक्ता रणधीर जायसवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पीओकेत १५-२० दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैन्याकडून करण्यात आल्याचं सांगितलं. तसेच जम्मू आणि काश्मीरच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीयपणे हाताळले पाहिजेत अशी आमची दीर्घकालीन राष्ट्रीय भूमिका आहे. त्या धोरणात बदल झालेला नाही. तुम्हाला माहिती आहेच की, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेला भारतीय भूभाग सोडणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे, असे म्हटले.
ते पुढे म्हणाले, १० तारखेला सकाळी आम्ही पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रमुख तळांवर अत्यंत प्रभावी हल्ला केला होता. त्यामुळेच ते आता गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यास तयार होते. मी स्पष्ट करू इच्छितो की भारतीय शस्त्रसंस्थांच्या ताकदीमुळे पाकिस्तानला गोळीबार थांबवावा लागला.