भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशानं राज्यातील विविध संघटनात्मक जिल्ह्यांसाठी नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या चार प्रमुख विभागांतील एकूण ५८ जिल्ह्यांमध्ये नव्या अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. या नव्या नेतृत्वामार्फत पक्षाचे गावपातळीवरील संघटन अधिक बळकट करण्याचा आणि आगामी स्थानिक तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षकार्याला अधिक मजबुती देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
वाचा संपूर्ण यादी
कोकण1) सिंधुदुर्ग – प्रभाकर सावंत2) रत्नागिरी उत्तर – सतिष मोरे3) रत्नागिरी दक्षिण – राजेश सावंत4) रायगड उत्तर – अविनाश कोळी5) रायगड दक्षिण – धैर्यशील पाटील6) ठाणे शहर – संदिप लेले7) ठाणे ग्रामीण – जितेंद्र डाकी8) भिवंडी – रविकांत सावंत9) मिरा भाईंदर – दिलीप जैन10) नवी मुंबई – राजेश पाटील11) कल्याण – नंदू परब12) उल्हासनगर – राजेश वधारिया
पश्चिम महाराष्ट्र13) पुणे शहर – धिरज घाटे14) पुणे उत्तर (मावळ) – प्रदिप कंद15) पिंपरी चिंचवड शहर – शत्रुघ्न काटे16) सोलापूर शहर – रोहिणी तडवळकर17) सोलापूर पूर्व – शशिकांत चव्हाण18) सोलापूर पश्चिम – चेतनसिंग केदार19) सातारा – अतुल भोसले20) कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) – राजवर्धन निंबाळकर21) कोल्हापूर पश्चिम (करवीर) – नाथाजी पाटील22) सांगली शहर – प्रकाश ढंग23) सांगली ग्रामीण – सम्राट महाडिक
उत्तर महाराष्ट्र 24) नंदुरबार – निलेश माळी25) धुळे शहर – गजेंद्र अंपाळकर26) धुळे ग्रामीण – बापू खलाने27) मालेगाव – निलेश कचवे28) जळगांव शहर – दीपक सूर्यवंशी29) जळगांव पूर्व – चंद्रकांत बाविस्कर30) जळगांव पश्चिम – राधेश्याम चौधरी31) अहिल्यानगर उत्तर – नितीन दिनकर32) अहिल्यानगर दक्षिण – दिलीप भालसिंग
मराठवाडा33) नांदेड महानगर – अमर राजूरकर34) परभणी महानगर – शिवाजी भरोसे35) हिंगोली – गजानन घुगे36) जालना महानगर – भास्करराव मुकूंदराव दानवे37) जालना ग्रामीण – नारायण कुचे38) छत्रपती संभाजीनगर उत्तर – सुभाष शिरसाठ39) छत्रपती संभाजीनगर पश्चिम – संजय खंबायते40) धाराशि – दत्ता कुलकर्णी
विदर्भ41) बुलढाणा – विजयराज शिंदे42) खामगाव – सचिन देशमुख43) अकोला महानगर – जयवंतराव मसणे44) अकोला ग्रामीण – संतोष शिवरकर45) वाशिम – पुरुषोत्तम चितलांगे46) अमरावती शहर – नितीन धांडे47) अमरावती ग्रामीण (मोरणी) – रविराज देशमुख48) यवतमाळ – प्रफुल्ल चव्हाण49) पुसद – डॉ आरती फुफाटे50) मेळघाट – प्रभुदास भिलावेकर51) नागपूर महानगर – दयाशंकर तिवारी52) नागपूर ग्रामीण (रामटेक) – अनंतरावर राऊत53) नागपूर ग्रामीण (काटोल) – मनोहर कुंभारे54) भंडारा – आशु गोंडाने55) गोंदिया – सिता रहांगडाले
मुंबई 56) उत्तर मुंबई – दिपक बाळा तावडे57) उत्तर पूर्व मुंबई – दिपक दळवी58)उत्तर मध्य मुंबई – विरेंद्र म्हात्रे