शिर्डीच्या साई दरबारात भक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही साई संस्थानला किती देणगी देता? यावरुन तुम्हाला तिथे कोणत्या सुविधा मिळतील हे ठरणार आहे. साईबाबा संस्थानच्यावतीने सुधारित सुविधा धोरण आणण्यात आलं आहे.
साई भक्तांना देणगीनुसार दर्शन आणि आरती पास, प्रसाद, पूजेचे कूपन्स, सन्मानचिन्हे या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. याचे दर जाहीर करण्यात आले आहेत. व्हीहीआयपी दर्शन आणि वस्त्र अर्पण याचादेखील यात समावेश आहे.