हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिनं शेअर केलेल्या काही व्हिडीओंमध्ये पाकिस्तनातील उच्चायुक्तालयातील काही अधिकाऱ्यांचे चेहरे सातत्यानं समोर येत असून आता अधिकारी म्हणून ठराविक पदांच्या आडून ही मंडळी भारतातच राहून नेमकी कधी कटकारस्थानं रचत होती हे समोर आले आहे.
पाकिस्तानी अधिकारी दानिश अलीबाबत धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. दानिश अली व्हिसा विभागात काम करत होता. व्हिसासाठी अर्ज करणा-या नागरिकांना तो भेटायचा. एकट्याने पाकिस्तानात जाणाऱ्या लोकांवर त्याची नजर असायची. दानिशच्या निशाण्यावर विधवा आणि गरजू मुली असायच्या. तसंच सोशल मीडिया इन्फ्लूएंसर आणि आर्थिकदृष्टया कमजोर मुलंही दानिशच्या टार्गेटवर होत्या.
दानिशला जाणीवपूर्वक पाकिस्तानच्या व्हिसा विभागात सेवेत ठेवण्यात आलं होतं. व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना तो भेटत असे. त्यातही एकट्यानं पाकिस्तानला जाऊ इच्छिणाऱ्यांवर त्याचं विशेष लक्ष होतं. आर्थिक तंगी असणाऱ्यांना त्यानं निशाण्यावर ठेवलं होतं. यामध्ये कट्टरतावादी आणि इन्फ्लूएन्सरही होतेच.
भारतात जेव्हा पहलगाम हल्ल्याच्या तपासादरम्यान पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी काही नावं समोर आली आणि अटकेच्या कारवाईला सुरुवात झाली तेव्हा त्यातून अनेक नावं पुढे आली. ज्यामध्ये दानिशनं भारतात तयार केलेले त्याचे अनेक ‘अय्यार’ पुढे आले.
हा तोच दानिश आहे, ज्याला काही दिवसांपूर्वी भारतविरोधी भूमिका आणि पाकिस्तानही हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून देशातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. इथं राहून त्यानं हेरांची एक टोळी तयार केली होती, यामध्ये कैक युट्यूबर्सचा समावेश होता. युट्यूबर ज्योती मल्होत्रा, उर्दू शिक्षक गजालाही यात समावेश होता. प्रियंका सेनापती, ट्रॅवल ब्लॉगर नवांकुर चौधरी यांचाही या नावांमध्ये समावेश असून तोसुद्धा ज्योतीच्या संपर्कात असल्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.