गोलिया पहलगाम में चली थी, इन आतंकवादीयों कों कल्पनासे परी सजा देंगे ऐसा हमने कहां था. आपल्या सरकारने देशाच्या तिन्ही सैन्य दलास पूर्णपणे मोकळीक दिली होती. त्यामुळेच, तिन्ही सैन्य दलाने एकत्र येऊन चक्रव्यूह रचलं, पाकिस्तानना गुडघे टेकायला भाग पाडलं, असे म्हणत मोदींनी भारतीय सैन्य दलाच्या कारवाईचं कौतुक केलं. राजस्थानच्या बिकानेर येथे रेल्वेच्या पायाभूत विकासाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, २२ तारखेला झालेल्या हल्ल्याच्या उत्तरात २२ मिनिटांत भारताने ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. जेव्हा देशातील महिलांच्या कपाळाचं कुंकू स्फोटकं बनत तेव्हा काय होतं, हे आम्ही दाखवून दिलं. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, देश नहीं झुकने दूंगा. जो सिंदूर मिटाने निकले थे उन्हे हमने मिट्टी में मिलाया हैं, असे म्हणत मोदींनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. जे हत्यारांवर गर्व करायचे ते आज मृत्यूच्या ढिगाऱ्याखाली दबले आहेत, हा शोध प्रतिशोध नाही तर न्यायाचं नवं स्वरूप आहे. हा आक्रोश नाही तर समर्थ भारताचे रौद्र रुप आहे, नव्या भारताचे स्वरूप आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर घणाघात केला.
यावेळी उद्घाटन केलेल्या प्रकल्पांबद्दल बोलताना देशातील १८ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश देखील आपल्यासोबत रेल्वेने जोडले गेले आहेत. करणीमातेच्या आशीर्वादाने विकसित भारत बनवण्याचा संकल्प पूर्ण होतं आहे. आज २६ हजार करोड रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण झालं असून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. विकसित भारत बनवण्यासाठी आज देशात आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठी यज्ञ सुरू आहे, असे म्हटले.