अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाच्या माऱ्यानं महाराष्ट्राला झोडपून काढलेलं असतानाच आता प्रत्यक्षाच मान्सूनचे वारे अर्थात नैऋत्य मोसमी वारे अंदमान आणि निकोबार बेट समुहांवर दाखल झाले आहेत. तसेच त्यांचा पुढील प्रवास अतिशय समाधानकारक वेगात पुढील रोखानं सुरू आहे. पुढे श्रीलंका, बंगालचा उपसागर असे टप्पेही त्यांनी गाठले, ज्यामुळं मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात आणि केरळात दाखल होणार असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यानं मात्र या मोसमी वाऱ्यांच्या वाटेत काही अंशी अडथळा आणल्याची प्राथमिक शक्यता आता वर्तवली जात आहे. कारण, नैऋत्य मोसमी वारे बुधवारपासून एकाच जागी स्थिरावले/ रेंगाळले आहेत. गुरुवारीसुद्धा या वाऱ्यांची फारशी प्रगती झालेली नाही.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यानं मात्र या मोसमी वाऱ्यांच्या वाटेत काही अंशी अडथळा आणल्याची प्राथमिक शक्यता आता वर्तवली जात आहे. कारण, नैऋत्य मोसमी वारे बुधवारपासून एकाच जागी रेंगाळले आहेत. गुरुवारीसुद्धा या वाऱ्यांची फारशी प्रगती झालेली नाही.
असं असलं तरीही मान्सून्या प्रगतीसाठी पोषक वातावरणनिर्मिती होत नाही, अशी परिस्थिती सथ्या उदभवली नाही असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. मान्सून वाऱ्यांचा सध्याचा वेग पाहता २५ ते २७ मे दरम्यान मोसमी वारे करेळमध्ये दाखल होतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे. मान्सूननं मागील २४ तासांमध्ये अपेक्षित प्रगती केली नसली तरीही पुढील ४८ तासांमध्ये मात्र तो नक्कीच आगेकूच करण्याची शक्यता आहे.