मान्सून अखेर केरळात दाखल झाला आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. हवामान विभागाच्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वारे शनिवार २४ मे २०२५ रोजी केरळमध्ये दाखल झाले असून, सामान्य तारखेच्या अर्थात १ जूनच्या ८ दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे असंही आयएमडीनं सांगत देशभरातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला.
देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या देवभूमीत मान्सून धडकला असून, आता तो पुढचा प्रवासही तुलनेनं अपेक्षित तारखेआधीच करत महाराष्ट्रार्यंत साधारण आठ दिवस आधीच मजल मारेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं मे महिन्याच्या अखेरीस मान्सूननं तळ कोकणातून राज्याच प्रवेश केल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.आश्चर्याची बाब म्दणजे २००९ नंतन नैऋत्य मोसमी वारे पहिल्यांदाच इतक्या लवकरच केरळमध्ये दाखल झाले आहेत. ज्यामुळं यंदा मान्सूनचा मुक्काम मोठा असेल असंही म्हटलं जात आहे.