दिल्लीत आप भाजपमध्ये कांटे की टक्कर! दिल्लीत हवा कुणाची?

दिल्लीत 70 जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडली आहे. दिल्लीत 70 जागांसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
दिल्लीत 17,766 मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीमध्ये सुमारे 1 कोटी 56 लाख मतदार मतदान करण्यास पात्र असल्याचे समजते आहे. त्यामुळे 8 तारखेला मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे ते स्पष्ट होणार आहे.

आम आदमी पक्ष, भाजप , कॉँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष आपण केलेल्या कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर काँग्रेस आणि भाजप सत्ता परिवर्तन करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत.

मतदानाची टक्केवारी घसरली

मतदारांची मतदानाची टक्केवारी निर्णायक भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६२.५९ टक्के होती. मागच्या तीन विधानसभा निवडणुकांची तुलना केली तर यावेळी कमी मतदान झाले आहे. ईशान्य दिल्लीत सर्वाधिक ६३.८३ टक्के तर दक्षिण पूर्व दिल्लीत सर्वात कमी ५३.७७ टक्के इतके मतदान झाले.

नवी दिल्ली मतदारसंघात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (आप), भाजप खासदार परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्यात स्पर्धा होत आहे. अरविंद केजरीवाल चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार का? याबद्दल उत्सुकता आहे.
प्रत्येक निवडणुकीत त्या-त्या पक्षाचा चेहरा कोण असणार यावर देखील निवडणुकीचा निकाल अपेक्षित असतो. आम आदमी पक्षाकडे अरविंद केजरीवाल तर भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक दोघांसाठी महत्वाची समजली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here