दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची श्रीकांत शिंदेंची मागणी

मुंबईतील रेल्वे अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेत सहा प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. दोन लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने खाली ट्रॅकवर पडले, आणि मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करावी अशी मागणी होत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला मागणी करणारे पत्र लिहिलं आहे.

लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. श्रीकांत शिंदे यांनी अपघातात जखमी झालेल्यांची कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here