पुण्यातील कुख्यात गुंड शिवम आंदेकरला अटक

पुण्यात अनेक गुंड टोळ्यांची दहशत वाढत आहे. शहराच्या मध्यवस्तीतील नाना पेठेतील मच्छी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या एका मासेविक्रेत्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी कुख्यात आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी टोळीचा प्रमुख शिवम आंदेकरला पोलिसांनी अटक केली आहे. शिवमसह त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका मासेविक्रेत्याने आंदोकर टोळीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार ३८ वर्षीय मासेविक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मासे विक्रीचा स्टॉल नाना पेठेतील मच्छी मार्केट परिसरात आहे. शिवम आंदेकर आणि त्याचे साथीदार गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्याकडे दरमहा ५० हजार रुपये खंडणी मागत होते. पैसे न दिल्यास स्टॉल बंद पाडण्याची आणि जीवे मारण्याची धमकीही दिली गेली होती.

तक्रारदाराने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीच्या आधारे फरासखाना पोलिसांनी शिवम आंदेकरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शिवम आंदेकरला ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.पोलिसांकडून तपास सुरूफरासखाना पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत शिवम आंदेकरला अटक केली असून, त्याच्या टोळीतील अन्य सदस्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here