मेघालयात हनिमून साजरा करण्यासाठी गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणी राजाची पत्नी सोनमला उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमधून अटक केली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मेघालय या तिन्ही राज्यांमध्ये या हत्याकांडामुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी इंदोरचा व्यावसायिक राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशीला वाराणसी-गाजीपूर हायवेवरील एका ढाब्यावरुन ताब्यात घेतलं आहे. सोनमने कथितपणे आपला प्रियकर आणि इतरांच्या माध्यमातून मेघालयाच पतीच्या हत्येचा कट आखला होता असा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांनी दावा केला आहे की सोनम आधीच हत्येत सहभागी आरोपी विशाल सिंग आणि राज कुशवाहाला ओळखत होती. ती त्यांच्यासोबत शिलाँगलाही गेली होती. राज कुशवाह हा सोनमचा प्रियकर असल्याचं म्हटलं जात आहे. विशाल सिंग चौहान उर्फ विकी याला इंदूर पोलिसांनी आधीच अटक केली आहे. असे सांगितले जात आहे की तिन्ही आरोपी सोनमचा भाऊ गौरव रघुवंशी याच्या नावाने नोंदणीकृत एका खाजगी कंपनीत काम करत होते. राज त्या कंपनीत अकाउंटंट होता.