आज सोन्याच्या दरात थोडे उलटफेर झाले आहेत. आज सोनं किचिंतसं घसरलं आहे. मात्र सोन्याचे दर लाखांच्या घरातच आहेत. काही तज्ज्ञांच्या मते सोनं लवकरच सव्वा लाखांचा आकडा पार करू शकतो. चांदीच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास आज चांदी ८६ रुपयांनी घसरले असून चांदी प्रतिकिलो १०६४०७ वर पोहोचलं आहे.
आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात १७० रुपयांची घट झाली असून त्यामुळं सोनं १,०१,५१० रुपयांवर पोहोचले आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात १५० रुपयांची घट झाली असून १० ग्रॅम सोनं ९३,०५० रुपयांवर पोहोचले आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात १२० रुपयांची घट झाली असून २४ कॅरेट सोनं ७६,१४० रुपयांवर पोहोचले आहे.