संजय राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाले ‘ठाण्याचा अब्दुल्ला’!

तुम्ही भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाला होतात. तुमचं तुम्ही पाहा ना? आम्ही कोणासोबत युती करावी, हा आमचा, दोन भावांचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? बेगानी शादीमध्ये ठाण्याचा अब्दुल्ला का नाचत आहे? अशा शब्दांत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. कोण मेलं आहे आणि कोण जिवंत आहे हे येणारा काळ ठरवेल असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे.

“राज ठाकरे, उद्धव ठाकरे भाऊ आहेत, दोन्ही एकाच विचारधारेचे पक्ष आहेत. दोघे काय करायचं ते ठरवतील. महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुमचा इतका तिळपापड का झाला आहे? तुमची अघोरी विद्या कामी येत नाहीये का? तुमची फुटलेली शिंगं तुम्हाला साथ देत नाही आहेत? गुवाहाटीत कापलेले रेडे भविष्यात यश प्राप्त करुन देत नाही आहेत? आमचं आम्ही पाहू. तुमची फडणवीसांनी काय अवस्था केली आहे ते पाहा. तुमचं पायपुसणं केल आहे, पोतेरं केलं आहे. यांना रात्री झोप लागत नाही, तळमळत असतात. आपलं काय होईल या चिंतेत कूस बदलत असतात,” अशी जहरी टीका एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here