नवी मुंबई विमानतळ कधी पूर्ण होणार? मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

बहुचर्चित नवी मुंबई विमानतळ कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर २०२९ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा २०३२ पर्यंत आणि चौथा टप्पा २०३६ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली.

सप्टेंबर अखेर नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होईल, अशी माहिती उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. दरम्यान, नवी मुंबई विमानतळ ११६० हेक्टर परिसरात उभारण्यात येत आहे. या विमानतळाचा रनवे ३.७ किमी इतका लांब असून या विमातळावर एकाचवेळी ३५० विमाने उभी राहू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here