अली फजलच्या ‘या’ सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता!

सिनेमाचा पडदा असो किंवा ओटीटीची स्क्रीन, अशा दोन्ही माध्यमांमध्ये अभिनेता अली फजल यांनं स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. २०२५ मध्येही विविध माध्यमांतून तो आपला ठसा उमटवणार आहे. यंदाच वर्ष आपल्यासाठी खास असल्याचं तो आवर्जून सांगतो.. यावर्षी अली फजल अनुराग बासूच्या बहुप्रतिक्षित ‘मेट्रो… इन दिनों’ या सिनेमात दिसणार आहे, तर ‘मिर्झापूर : द मूव्ही’ मध्ये पुन्हा एकदा त्याचा गुंडाराज प्रेक्षकांना दिसणार आहे. याशिवाय, मणिरत्नम दिग्दर्शित ‘थग लाइफ’या तमिळ सिनेमातही तो आहे. या सिनेमाच्या निमित्तानं तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करतोय.

ओटीटीविश्वातही अली पुन्हा एकदा अभिनयाची चमक दाखवायला येतोय. राज आणि डीके यांच्या ‘रक्तब्रह्मांड’ या काल्पनिक वेब सीरिजमध्ये तो एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. याशिवाय, आमिर खान निर्मित ‘लाहोर १९४७’ मध्ये अली सनी देओलबरोबर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकंच नव्हे, तर तो रूल ब्रेकर्स यांच्या हॉलिवूड सिनेमातही काम करतोय. ओटीटी ते हॉलिवूड त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here