राज्यात मोठा खत घोटाळा समोर!

राज्यात एक मोठा खत घोटाळा समोर आला असून, यात थेट मध्य प्रदेश कनेक्शन समोर आलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहराच्या लगतच मध्यप्रदेश राज्याची सीमा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेश मधील शेतकरी विना परवाना रासायनिक खते घेऊन जाताना कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली.

गोंदियात करण्यात आलेल्या या कारवाईत तीन मालवाहक जप्त करण्यात आले असून गाडी चालकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेतकरी कृषी केंद्रात रासायनिक खते खरेदीसाठी गर्दी करून आहेत परंतु काही कृषी केंद्र लालसेपोटी परप्रांतीय शेतकऱ्यांना विनापरवाना खत विक्री करीत असल्याचे शहरात आढळून आले आहेत.

परप्रांतीय शेतकरी रासायनिक खते पर राज्यात घेऊन जात असताना कृषी विभागाला माहिती मिळताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करून तीन वाहनांची जप्ती केली. ४५ गोणी भरून असणाऱ्या या रासायनिक खताची एकूण किंमत ४५ हजार रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here