एसटी महामंडळाचा शिवशाही बसेस बद्दल मोठा निर्णय!

एसटी महामंडळाने सर्व ‘शिवशाही’ बसबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या टप्प्याटप्प्याने ‘हिरकणी’मध्ये परावर्तित केल्या जाणार असून भविष्यात ‘शिवशाही’ बस राज्यातील रस्त्यावर धावताना दिसणार नाही. एसटी महामंडळाने वातानुकूलित ‘शिवशाही’ बस ‘हिरकणी’ बसमध्ये परावर्तित करण्याचे नियोजन केले. पुण्यातील दापोडी येथील एसटीच्या छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथील मध्यवर्ती कार्यशाळेत ‘शिवशाही’ बसचे ‘हिरकणी’ बसमध्ये रूपांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

खरं तर एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यापासून ‘शिवशाही’ बसने खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. वाहतुकीच्या स्पर्धेत ‘शिवशाही’ अग्रगण्य ठरत होती. परंतु, आता एसटी महामंडळाचा मोठा ब्रॅण्ड असलेली ‘शिवशाही’ हळुहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे. ‘शिवशाही’ चे रुपांतर ‘हिरकणी’ बसमध्ये करण्यात येत आहे. ‘शिवशाही’चे रुपांतर झालेली पहिली ‘हिरकणी’ बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली असून लवकर प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here