आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये तात्काळ सुनावणी करावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि पक्ष चिन्ह यासंदर्भात तातडीने सुनावणी व्हावी अशी उद्धव ठाकरेंच्या पक्षाची इच्छा आहे. यासंदर्भात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. आज ज्येष्ठ वकील देवदत्त कामात यांनी तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.